अहमदनगर (प्रतिनिधी वाजिद शेख) – सोलापूर रोडवरील कॅन्टोन्मेंट टोलनाका येथे रात्री स्कॉर्पिओ व दुचाकीवरून आलेल्या दहा दरोडेखोरांनी टोल नाका इन्चार्ज अजय सुगंध शिंदे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून व टोलनाका सुपरवायझर सचिन पवार यांना कोयत्याने मारहाण करून टोल नाक्याच्या गल्ल्यातील सुमारे ४६ हजार रुपये रोख रक्कम घेऊन पळून गेले आहेत.
याप्रकरणी संदीप उर्फ म्हम्या शरद शिंदे (रा. बुरुडगाव रोड ,भागवत चाळ ता. नगर), विक्रम गायकवाड (रा. वाळुंज पारगाव ता. नगर), बाबा आढाव (रा. वाळुंज पारगाव ता. नगर), संदीप वाकचौरे (रा. दरेवाडी ता. नगर), प्रकाश कांबळे(पूर्ण नाव नाही रा. कोंबडीवला मळा ता. नगर) इतर दोन अनोळखी इसम विरोधात भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील आरोपी संदीप शिंदे यास ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच स्कॉर्पिओ व दोन दुचाकी ताब्यात घेण्यात आले आहेत इतर आरोपी यांचा शोध घेत आहेत.







