ड्रग्ज प्रकरणी हर्ष-भारतीची वैद्यकीय चाचणी, थोड्याच वेळात कोर्टात हजर करणार

bharati-singh

मुंबई (हितेश मिस्त्री) – ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हर्ष लिंबाचीया आणि भारती सिंह यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. थोड्याच वेळात त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. वैद्यकीय तपासणीस उशीर झाल्यास त्यांना थेट कोर्टात नेले जाणार आहे. तब्बल 17 तास चौकशी केल्यानंतर हर्ष लिंबाचीयाला अटक करण्यात आली होती. भारती आणि हर्षच्या घरात 86 ग्रॅम गांजा सापडला होता. त्यानंतर कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती अभिनेता हर्ष लिंबाचियाला एनसीबीने ताब्यात घेतलं होतं. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास भारतीला अटक करण्यात आली होती. त्यापाठोपाठ हर्षलाही अटक करण्यात आली होती.

 

एनसीबीने काल खार दांडा येथे कारवाई केली होती. या ठिकाणाहून एका 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे 15 बॉटल एल. एस. डी. हे ड्रग आणि 40 ग्राम गांजासह नेट्राझेपम हे ड्रग्स स्वरूपातील औषध ही सापडले आहे. या ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या व्यक्तीच्या चौकशीत कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष यांचे नाव उघडकीस आले.

 

यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी भारती हिच्या घरी धाड टाकली असता, तिच्या घरी 86.5 ग्राम गांजा सापडला. भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष या दोघांनीही ते गांजा घेत असल्याची कबुली दिली आहे. यानंतर भारती सिंग हिला एनडीपीएस कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे. तर, हर्षची चौकशी सुरु होती. त्याच प्रमाणे इतर कारवाईत गुन्हा क्रमांक 33/20 मध्ये एनसीबीने मोठ्या प्रमाणात एमडी हे ड्रग्स जप्त केले आहे. एनसीबीने दोन फरार गुन्हेगारांना अटकही केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here