हडपसर येथे तरुणाचा कोयत्याने वार करून खून

कोयत्याने-वार

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पूर्ववैमनस्यातून धारदार कोयत्याने सपासप वार करून तरुणाचा खून केल्याची घटना हडपसरजवळील मांजरी फार्म येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रासमोर शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

 

अनिकेत शिवाजी घायतडक (वय 19, रा. माळवाडी, हडपसर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शुभम मोडक (रा. मांजरी), प्रकाश कांबळे, प्रतीक तांबेकर व बंटी तुपे (तिघेही रा. माळवाडी, हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्या अन्य एका साथीदारावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रकाश शिवाजी घाडगे (22, रा. रेल्वे गेटपलीकडे, काळेपडळ, हडपसर) याने फिर्याद दिली आहे.

 

20 नोव्हेंबर रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घाडगे याचा मित्र ओम भंडारी व घायतडक, असे तिघेजण मोडक याच्याकडे पैसे आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी मोडक याने त्याच्या पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून घायतडकला खाली पाडले. त्याचवेळी कांबळे, तांबेकर आणि तुपे यांनी कोयत्याने घायतडकवर वार केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here