नोकरी जाण्याच्या भीतीने इंजिनिअरची आत्महत्या

pravin-joshi

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – नोकरी जाण्याच्या भीतीने मंगळवार पेठेतील सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रवीण गणेश जोशी (वय 33, प्रथमेश प्लाझा, संभाजीनगर, मंगळवार पेठ) असे त्याचे नाव आहे. याची नोंद राजवाडा पोलिसांत झाली.

 

प्रवीण जोशी हा 4 वर्षांपासून पुण्यातील एका इन्फोटेक कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरीस होता. मार्च महिन्यात कोरोना महामारीत लॉकडाऊनमुळे तो कोल्हापुरात परतला होता. सध्या तो घरातूनच ऑनलाईन काम करीत होता.

पंधरा दिवसांपूर्वी त्याला समजले की, कंपनीतील काही सहकार्‍यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. तसेच त्यालाही 1 डिसेंबरला पुणे येथील कंपनीच्या कार्यालयात बोलावले होते. आपल्यालाही कामावरून कमी करतील, या भीतीतून त्याला नैराश्य आले होते. याच भीतीपोटी त्याने शनिवारी दुपारी राहत्या घरी हॉलमधील पंख्याला गळफास घेतल्याचे त्याचे वडील गणेश जोशी (72) यांनी पोलिसांना आपल्या जबाबात सांगितले.

प्रवीणच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. सीपीआरमध्ये उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. ऐन तारुण्यात नोकरी जाण्याच्या धास्तीने प्रवीण जोशी याने आत्महत्या केल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्‍त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here