अमरत्त्व मिळवण्याच्या नादात मामा-भाच्यासह तीन तरुणांनी गमावला जीव

thane-sucide

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यात चांदा गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरत्त्व मिळवण्यासाठी केलेल्या अघोरी विद्येच्या प्रयत्नात तीन तरुणांचा जीव गेल्याची घटना घडली आहे. शहापूर तालुक्यातील खर्डी जवळील चांदा गावातील मामाभाचे व शहापूर येथील एका विवाहित तरुणाचा मृतांमध्ये समावेश आहे. तिघांनी गावापासून जवळच्या जंगलात जाऊन एका झाडाला साडीने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी प्राथिमिक माहिती समोर आली आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, 14 नोव्हेंबरला म्हणजेच लक्ष्मीपूजनच्या अमावस्येला रात्री 11 च्या सुमारास नितीन भेरे (वय-35, रा. शहापूर), महेंद्र दुभेले (वय-30, रा.चांदा, खर्डी) व मुकेश घावट (वय-22, रा.चांदा, खर्डी) हे तिघे बेपत्ता झाले होते. त्यानंतर शोधा शोध सुरु असताना या तिघांचे मृतदेह जंगलातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेले आढळून आले

 

तिघांचे मृतदेह ज्या पद्धतीने आढळलेत आणि आधीपासून या तिघांबाबत परिसरात वेगळीच चर्चा होती. त्यानुसार एक तर लक्ष्मीपूजन अमावस्येच्या रात्री मुक्ती मिळवण्यास म्हणजेच अमरत्व मिळवण्यास तिघांनी लटकून घेतलं असावं. तर यांनी कोणाला तरी मुक्ती मिळवून देण्याचे सांगितले होते. पण ते न झाल्याने या तिघांची कोणीतरी हत्या केली असावी, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे हत्या की आत्महत्या या दोन्ही थेअरीनुसार शहापूर पोलिस तपास करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here