नालासोपारा येथे जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ३७ जणांना अटक

nalasopara-crime

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – वसई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकून जुगार खेळणाऱ्या 37 जणांना अटक केली आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

नालासोपारा पूर्वेकडील तुळींज परिसरातील आप्पा नगर परिसरात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्यावर पोलिसांचा छापा मारला. यावेळी 90 हजारांची रोकड आणि टोकन असा लाखोंचा माल जप्त केला आहे. पुढील तपास तुळींज पोलीस करीत आहेत. हा अनधिकृत जुगार अड्डा टोकन पद्धतीने चालविला जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांना मिळाली होती.

 

या माहितीनंतर पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, महादेव वेदपाठक, मंगेश चव्हाण, सागर बारावकर, रमेश अलदर, पि एन काळे यांच्या पथकाने सापळा रचून 37 आरोपींना अटक करून तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईनंतर शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये चांगलीच घबराट उडाली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here