पिंपरीत गावठी दारू भट्टीवर छापा; 16 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त

pimpari-gavathi-daru-bhatti

हिंजवडी परिसरात पुणे पोलिसांची धडक कारवाई

पुणे (प्रतिनिधी अमोल सोळुंके) – गावठी दारू भट्टीवर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. यामध्ये पोलिसांनी दारू तयार करण्याचे रसायन, कार, दुचाकी, मोबाइल आणि अन्य साहित्य असा एकूण 16 लाख 75 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हिंजवडी परिसरातील मुळा नदीच्या काठावर ही कारवाई करण्यात आली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, बाबू राठोड आणि राम क्षीरसागर अशी आरोपींची नावं असून दोघांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी परिसरात गस्त घालत असताना मुळशी तालुक्‍यातील माण इथं मुठा नदीच्या काठावर काही व्यक्ती अवैधरित्या गावठी दारू तयार करून त्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी रात्री साडेदहा वाजता दारू भट्टीवर छापा मारला.

 

 

यानंतर दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पाच लाख रुपयांची नऊ हजार लिटर दारू, रसायनं, 70 हजार 500 रुपयांची 1 हजार 175 लिटर तयार दारू, 9 हजारांचे तीन हजार किलो सरपण, 10 लाखांची एक कार, पाच हजारांची थर्मल जाळी आणि एक हजाराचा मोबाइल फोन असा एकूण 16 लाख 75 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

pimpari-gavathi-daru

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here