‘ती’ आठ महिन्यांपासून राहत होती आईच्या मृतदेहासोबत

dead-body

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मुंबई पोलिसांना वांद्रे येथील घरात ८३ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मार्च महिन्यातच महिलेचा मृत्यू झाला आहे. मात्र यानंतरही महिलेच्या ५३ वर्षीय मुलीने याबाबत कोणालाही माहिती दिली नाही. मुलगी गेल्या आठ महिन्यांपासून आईच्या मृतदेहासोबतच राहत होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. महिलेच्या शेजाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली असता हा प्रकार उघडकीस आला.

 

महिलेची मुलगी घऱाच्या खिडकीतून कचरा फेकत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस घरी पोहोचले असता मुलगी संपूर्ण लॉकडाउनदरम्यान आपल्या आईच्या मृतदेहासोबत घरात राहत असल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या निदर्शनास आली.

 

पोलिसांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता महिलेच्या मुलीची मानसिक स्थिती योग्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळेच मुलीने आईच्या मृतदेहासोबत कोणाला माहिती दिली नसावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. महिलेने काही वर्षांपूर्वी आपल्या कुत्र्याचा मृत्यू झाल्यानंतरही अशाच पद्दतीने कोणाला न कळवता घरात मृतदेह ठेवला होता अशी माहिती तपासात समोर आली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here