महामार्गावर वसूली करणारे तिघे पोलिस निलंबित

police-bribe
file photo

धुळे (विशेष प्रतिनिधी) – मुंबई- आग्रा महामार्गावरील लळींग टोलनाक्यावर उभे राहून वाहन चालकांना लुटणार्‍या मोहाड़ी पोलीस ठाण्यातील तिघा पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी तसे आदेश काढले आहेत.

 

लळींग टोलनाक्यावर तीन पोलिस कर्मचारी बिनधास्तपणे वाहन चालकांकडून पैसे घेत असतांनाची एक व्हिडीओ सुजाण नागरिकांनी मोबाईलमधून तयार केला. ती व्हिडीओ क्लीप थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे पाठविण्यात आली. महासंचालकांनी याबाबत संबंधित कर्मचार्‍यांची ओळख पटवून कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या.

 

त्यानुसार, जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी क्लीपची शहानिशा केली. ती लळींग टोलनाक्यावरील असल्याचे स्पष्ट केले तर तिघा पोलीस कर्मचार्‍यांची ओळख पटवुन ते मोहाडी पोलीस ठाण्याचे असल्याची खात्री झाल्यानंतर तिघांना निलंबित करण्यात आले. याप्रकाराची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेशही कनिष्ठ स्तरावरील अधिकार्‍यांना दिले आहेत. त्यात हवालदार बिपीन पाटील, पोकॉ सुरेंद्र खांडेकर व पोकॉ इम्रान शेख यांचा समावेश आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here