मोठ्या आवाजात गाणे वाजवण्यावरुन झाला वाद
बोदवड (प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी) – गाडीमध्ये मोठ्या आवाजावरून गाणे वाजवण्याच्या कारणावरून येथे रविवारी दुपारी दोन गटामध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी लाठ्या काठ्यांचा वापर करण्यात आला.
येथील बसस्थानकावर दुपारी साडेतीन वाजता सुमारास उभ्या असलेल्या एका खाजगी अँपे रिक्षा मध्ये टेपरेकॉर्डर व्दवारे जोरात गाणे वाजवू नको व गाण्याचा आवाज कमी असे येथिल युवकांने सागितले. मात्र त्याची कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने जामठी आणि लोणवाडी येथील युवकांमध्ये बेदम मारहाण झाली त्यात देखिल युवकाला लोणवाडी येथील एका गटाकडून लाठ्या – काठ्या द्वारे बेदम मारहाण करण्यात आली. त्यात हा युवक गंभीर जखमी झाला.
गावात या हाणामारीमुळे काही काळ अत्यंत तणावपूर्ण परिस्थिती होती दरम्यान काही वेळाने पोलिसांना पाचारण करण्यात आले त्यावेळी येथील बसस्थानकावर नागरिक मोठय़ा संख्येने गर्दी जमा झाली होती. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था लक्षात घेता त्यांना बसस्थानकावरुन पिटाळून लावले. मात्र पुन्हा दोन तासांनंतर या ठिकाणी वाद पुन्हा उफाळून आला. सायंकाळी वाद झाला. राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यां नी वाद मिटविला या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कुठल्याही गुन्ह्या दाखल करण्यात आला नव्हता.







