- या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त
- लोडशेडिंगमुळे जनतेच्या मनात प्रचंड रोष
भोकरदन (प्रतिनिधी संतोष साबळे पाटील) – भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे येथील तीन शेतकरी भावंडांचा बुधवारी रात्री विजेचा धक्का लागल्याने विहिरीत पडून मृत्यू झाला होता मयत युवकांच्या कुटुंबीयांची स्थानिक आमदार नारायण कुचे व किसान युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष यशवंत गोसावी बुलंद छावाचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश वेताळ, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष देव कर्ण वाघ पाटील आदी मान्यवरांनी जाधव कुटुंबीयांची भेट घेऊन सात्वंन केले व योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले

पळसखेडा पिंपळे येथील मयत ज्ञानेश्वर आप्पासाहेब जाधव वय 27 वर्ष त्यांचे गेली चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. रामेश्वर आप्पासाहेब जाधव वय 25 वर्ष हा औरंगाबाद येथे शिक्षण करत होता. सुनील आप्पासाहेब जाधव वय18 वर्ष हा 10 वी मध्ये शिकत होता या तीन सख्ख्या भावांचा बुधवारी रात्री पिकाला पाणी देण्यासाठी गेल्यानंतर विद्युत धक्का लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या कुटुंबाला आता कुठलाही आधार नसल्यामुळे कमवती मुले गमावल्यामुळे यांना भरघोस मदत तत्काळ मिळावी हीच सर्वसामान्य जनतेची मागणी आहे







