ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – मुंबई व मुंबई उपनगरातील सर्व पक्ष – संघटनाचे कार्यकर्ता ,पदाधिकारी ह्यांना इंडीयन सोशिलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (ISRA)कडून मुंबई सोबतच मुंबई उपनगर नालासोपारा येथील ISRA चे पालघर जिल्हाध्यक्ष आयु प्रमोद जाधव ह्यांचे पालघर जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक ह्यांच्यासाठी कल्याण येथील बापसाई गाव येथे बेघराना घर व बेरोजगारांना स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.
ह्या शिबीरासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक ह्यांना येण्याजण्यासाठी संघटनेकडून दोन बस देण्यात आल्या होत्या त्यातील एका मध्ये संपूर्ण पालघर जिल्हा पदाधिकारी,कार्यकर्ते व समर्थक तर दुसऱ्या बस मध्ये मुंबईतील प्रमुख पाहुणे व नवीन होऊ इच्छिणारे कार्यकर्ते व पदाधिकारी आले होते.
ISRA पुरस्कृत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पुनर्बांधणीचे महत्व व येत्या काळात मुंबई व मुंबई उपनगरात RPI चे नगरसेवक कसे निवडून येतील ह्या बद्दल माहिती दिली गेली.सोबत एक ही कार्यकर्ता हा बेघर किंवा बेरोजगार नसावा ह्याची जाणीव करून देण्यात आली . तसेच प्रत्येक कार्यकर्त्यानी आपले जीवनमान उंचावण्यासाठी आता झोपडपट्टी सोडून फ्लॅट मध्ये येऊन स्वतःचा एखाद्या छोटासा का होईना परंतु लघु उद्योजक बनले पाहिजे ह्यासाठी सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले. ह्या शिबिरातून जवळपास 20 पदाधिकारी निवडण्यात आले ज्यांना संघटनेच्या माध्यमातून स्वतःचे 1 BHK फ्लॅट व स्वतःच्या लघु उद्योग सुरु करण्यासाठी भांडवल देण्याचे ठरवले गेले

इंडीयन सोसिएलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (ISRA) पुरस्कृत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पुनर्बांधणीचे अश्या प्रकारचे कार्य तो पर्यंत सुरू राहील जो पर्यंत रिपब्लिकन चळवळीतील प्रत्येक कार्यकर्ता झोपडपट्टी मधून फ्लॅट मध्ये येत नाही व स्वतःचा व्यवसाय सुरू करीत नाही.कारण स्वतःचा व्यवसाय सुरु केल्याशिवाय माझा समाज हा उद्योजकांचा समाज बनणार नाही.व जो पर्यंत माझा समाज उद्योजकांचा समाज बनत नाही तो पर्यंत स्वावलंबी बनणार नाही आणि जो पर्यंत स्वावलंबी बनणार नाही तो पर्यंत स्वाभिमानी ही बनणार नाही, असे प्रतिपादन संस्थापक व रा.अध्यक्ष : इंडीयन सोसिएलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन(ISRA) व राज्य संयोजक: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुनर्बांधणी अभियान गजानन सिरसाट यांनी यावेळी बोलताना केले आहे.







