ॲड.रोहिणीताई एकनाथराव खडसे यांची कोरोनावर मात

rohinitai-khadse

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांचा कोरोना अहवाल कोरोनामुक्त आला आहे. आज त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांच्यावर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते.

 

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची कन्या तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा आणि नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या रोहिणी खडसेंना १५ नोव्हेंबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी सारा आणि मुलगा समरजीत यांना देखील बाधा झाल्याने तिघांना शहरातील मेहरूण परिसरातील सारा मल्टिस्पेशालीटी हॉस्पीटल मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होत.

 

आठ दिवसांच्या उपचारानंतर आज तिघांना कोरोना अहवाल निगेटीव्ह आला असून तिघांना कोरोनावर मात केली. गेल्या आठवड्यात रोहिणी खडसे यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे आपल्या ट्विटर अकाउंट वरून सांगितले होते. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला यावेळी त्यांनी भावनिक होऊन रुग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानले.rohinitai-khevalkar

 

 

यावेळी बुलंद पोलिस टाइम्स्‌शी बोलतांना त्या म्हणाल्या की, आदिशक्ती मुक्ताई,आणि आईवडिलांचा आशिर्वाद, आामच्यावर उपचार करणारा सारा हॉस्पिटलचे डॉक्टर्स, नर्स, सर्व स्टाफ यांच्या सहकार्याने तसेच तुम्हा सर्वांचे आशिर्वाद,स्नेह शुभेच्छा,सदिच्छाच्या बळावर मी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.आज हॉस्पिटलमधुन सुट्टी झाली असुन मी व माझे बाळ,परिवार सुखरुप आहोत,गेल्या दहा दिवसांच्या काळात आपण सर्वांनी मोबाईल,मँसेज द्वारे संपर्क साधुन तब्बेतीची विचारपुस केली,त्यातुन मला कोरोना सोबत लढायला एक आत्मीय शक्ती आणि बळ प्राप्त झाले.त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार,काही लोकांचे फोन कॉल,रिसिव्ह न करु शकल्याबद्दल क्षमस्व..तुम्हा सर्वांच्या सोबत राहण्यात जो आनंद आहे,आणि तुमच्या समस्या सोडवण्यातजे समाधान आहे त्याला कोरोना संक्रमणामुळे मी काही दिवस मुकले परंतु लवकरच आपल्या सेवेत लवकरच रुजु होऊन जनसेवेचा घेतलेला वसा सर्वांचा आशिर्वाद आणि सहकार्याने पुर्णत्वास नेईल..आपल्या सदिच्छा ,आशिर्वाद कायम असेच सोबत असु द्या.पुन्हा एकदा सर्वांचे मनःपुर्वक आभार.Rohini Khadse-Khewalkar

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here