सुरक्षेचे वचन देणारा पतीच भक्षक झाला

gang-rape

घरी आलेल्या ३ मित्रांसोबत सेक्स करण्यासाठी पत्नीवर दबाव

देवरिया – लग्नानंतर पत्नीच्या सुरक्षेचे वचन देणारा पतीच भक्षक झाला. दारूड्या पतीने आपल्या पत्नीला तीन मित्रांच्या हवाली केल्याचा आरोप करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पतीच्या तीन मित्रांनी बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. पीडितेने या प्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

 

 

ही घटना ११ नोव्हेंबरला घडली. दारूच्या नशेत पतीने आपल्या पत्नीला मारहाण केली, तसेच शिवीगाळ केली. त्यानंतर पतीच्या तीन मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप आहे. ११ नोव्हेंबरच्या रात्री दारूड्या पती तीन मित्रांसोबत घरी आला. त्यांच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी तिला सांगू लागला. तिने विरोध केल्यानंतर मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मित्रांनी बलात्कार केला, असा आरोप आहे. दुसरीकडे सासरची मंडळी हुंड्यासाठी छळ करत असल्याचा आरोपही तिने केला आहे.

 

 

१२ नोव्हेंबरला सकाळी हेल्पलाइन क्रमांक ११२ वर घटनेची माहिती दिली. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही, असे पीडितेचे म्हणणे आहे. त्यानंतर ती पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात गेली आणि तक्रार नोंदवली. पीडितेला न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही पोलिसांनी दिली. या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली असून, पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here