अंबड औद्योगिक वसाहतीत कामगाराचा मृत्यू

ambad-kamdar-death

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – अंबड औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराच्या अंगावर काचा पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे चित्र दिसत आहे.

 

 

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीतील गोडाउन मध्ये काम करीत असताना नवीन नाशकतील राणाप्रताप चौकात राहणारे अमोल भिकन कोळी ( 28 ) यांच्या अंगावर काचांचा ठेवलेला ढिगारा पडला.

 

 

त्यात काचा कोळी यांच्या अंगात घुसल्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असुन पुढील तपास वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here