पारोळा (प्रतिनिधी) – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर म्हसवे गावाजवळ समोरुन येणार्या चारचाकी वाहनाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणार्या मोटर सायकला धडक दिल्याने मोटर सायकल वरील वडील आणि मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना दि. 26 रोजी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास घडली.
महादु राजाराम सुर्यवंशी (वय 47) रा. म्हसवे उत्कर्षा महादु सुर्यवंशी (वय 21) हे आपल्या मोटरसायकलने पारोळ्या येथून बाजार आटोपून म्हसवे गावाकडे जात असतांना समोरून येणार्या चारचाकी वाहन हे जळगांव कडून भरधाव येत पुढील गाडीला ओव्हर टेक करीत असतांना समोरुन येणार्या मोटर सायकलला धडक दिली.
त्यात दोघे जखमी झाले होते हि घटना दि.26 रोजी 4.15 वाजता घडली होती. त्यांना कुटीर रुग्णालयात प्रथम उपचारार्थ दाखल करून पुढील उपचारार्थ धुळे येथे दाखल केले होते. उपचार सुरु असतांना दि. 27 रोजी सकाळी वडील आणि मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडल्याने म्हसवे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत पारोळा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल झाल्याची नोंद अद्याप करण्यात आलेली नसुन मृत महादु सुर्यवंशी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन भाऊ, आई, वडिल असा परिवार आहे.







