इस्लामाबाद – पाकिस्तानच्या पंजाब प्रातांत सोमवारी झालेल्या बस आणि व्हॅनच्या भीषण अपघातात १३ जण ठार झाले आहेत. बस आणि व्हॅनची धडक झाल्याानंतर व्हॅनला आग लागली. या आगीत होरपळून १३ जणांचा मृत्यू झाला. तर, १७ जण जखमी झाले आहेत. हा अपघात लाहोरपासून ७५ किमी दूर अंतरावर असलेल्या नारंग मंडी येथील कलाखटाई मार्गावर झाला.
हा अपघात धुक्यामुळे झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दाट धुक्यांमुळे दृष्यमानता कमी होती. त्यामुळेच बस आणि व्हॅन यांची समोरासमोर धडक झाली. धुक्यामध्ये वाहन चालवताना कमी वेगात वाहने चालवणे आवश्यक असताना ही वाहने वेगात धावत होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मदत आणि बचाव कार्य पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, धडक झाल्यानंतर व्हॅनने पेट घेतला. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. १३ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर, १७ जण गंभीर जखमी झाले आहेत.
समोर आलेल्या वृत्तानुसार, बससोबत टक्कर झाल्यानंतर व्हॅनमधील गॅसच्या टाकीचा स्फोट झाला आणि त्यामुळे आग लागली. पंजाब प्रातांचे मुख्यमंत्री उस्मान बजदार यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातात जखमी झालेल्यांवर चांगले उपचार करण्याचे निर्देश त्यांनी दिले







