पवईत गर्दुल्याच्या दोन गटात हाणामारी; एकाचा मृत्यू

pavai-crime

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – पवई आयआयटी मेन गेट जवळील गुलमोहर इमारतीसमोर काल (शनिवारी) रात्री ८ वाजेच्या सुमारास गर्दुल्यांच्या दोन गटात हाणामारी झाली. यात विनोद पाल उर्फ काली याची हत्या करण्यात आली आहे.

 

गर्दुल्ले एकमेकांवर हत्यारांनी हल्ले करीत होते. यावेळी विनोद पाल यास खोलवर घाव झाल्याने तो जमिनीवर कोसळला. यावेळी घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि विनोद पाल यास विक्रोळीच्या टागोरनगर येथील पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमी विनोदचे रक्तस्त्राव मोठया प्रमाणात झाल्याने त्यास घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात हलविण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

 

दोन्ही गटात तुफानी हाणामारी झाल्याचे प्रत्यदर्शींने सांगितले. पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार, गर्दुला व विक्रोळी पवईतील विविध घटनेतील आरोपी असणारा विनोद पाल उर्फ काली याच्या हत्या प्रकरणी पोलीसांनी ४ जणांना ताब्यात घेतले असून अधिक तपास पवई पोलीस करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here