चंदनाची तस्करी करणाऱ्या नेवासा येथील तरुणाला अटक

chandan-smaglur

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पुणे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने चंदनाची तस्करी करणाऱ्यास पाठलाग करुन जेरबंद केले. त्याच्या कडून 25 लाख 82 हजार 880 रुपये चा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सूरज कैलास उबाळे (वय 24) याला अटक केली तो मूळचा रा.चांदा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी आहे.

 

या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार , बातमीदारा मार्फत पोलिसांना बातमी मिळाली की पुणे-नगर रोड एक टेम्पो क्र. एम एच 17 बी डी 2698 हा नगर च्या दिशेने जात असून त्या मधे चंदनाच्या झाडाची लाकडे अवैध्यरित्या घेऊन जात असल्याची खबर मिळाली होती.

 

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून शिक्रापुर येथे चाकण चौकात मुद्देमाला सह एकाला जेरबंद केले. चंदनाची तस्करी छुप्या पद्धतीने केली जात होती, टेम्पो गाड़ीच्या हुडामध्ये एक छुपा कप्पा तयार केला होता. या कप्पात गोण्यांमध्ये 190 किलोग्राम वजनाची चंदनाच्या गाभ्याची लाकडे मिळून आली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here