धुळ्यात एटीएम कार्ड बदलून वृध्दाला 20 हजाराचा गंडा

atm-thief

धुळे (प्रतिनिधी) – एटीएममध्ये अडकलेले कार्ड हातचलाखीने बदलून नंतर 20 हजार रूपये काढून वृध्दांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

 

याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.शहरातील मार्केट यार्ड परिसरातील लक्ष्मी नगरातील रहिवासी बन्सीलाल भिला चौधरी (वय 68) हे दि. 29 रोजी दुपारी स्टेट बँकेच्या ट्रेझरी शाखेजवळील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते.त्यादरम्यान त्यांचे कार्ड मशीनमध्ये अडकले. तेव्हा एका तरूणाने कार्ड काढून देतांना ते हातचलाखीने बदलून घेतले.

 

त्यानंतर त्या कार्डव्दारे वेगवेगळ्या एटीएम सेंटरमधून 20 हजार रूपये घेतली. आपली फसवूणक झाल्याचे लक्षात येताच चौधरी यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here