दोंडाईचा येथे दुचाकी चोर जेरबंद; पाच जणांविरुद्ध गुन्हा

dondaicha-police-staion

दोंडाईचा (विशेष प्रतिनिधी) – दोंडाईचा पोलिसांनी अवघ्या चार तासात चोरट्यांना जेरबंद दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. याप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदखेडा तालुक्यातील रामी येथील रहिवासी अनिल हिंमत माळी याची दुचाकी (एमएच 18 एच 5714) रामी रस्त्यावरील बापू महाजन यांच्या पोल्ट्री फार्मजवळून दि. 29 रोजी चोरीस गेली.

 

त्यानंतर त्याने चुलत भाऊ, पोलीस पाटील श्रीकांत वाघ याच्यासह परिसरात शोध सुरू केला. त्यादरम्यान त्यांना एका मोबाईल क्रमांकवरून त्यांना फोन आला. तुमची दुचाकी माझ्या घरासमोर पाहिली असल्याचे सांगितले. त्यानंतर समीर नाजिम पिंजारी, यांचे मित्र सोहेल आमीन पिंजारी, फैजान निसान पिंजारी व अजगर सलीम उर्फ सुफा शेख यांनी दोन हजार रुपये दिले तर दुचाकी आणून देतो नाहीतर दुचाकी मोडून टाकेल, अशी धमकी दिली.

 

त्यानंतर पोलीस पाटील श्रीकांत वाघ हे नंदुरबार चौफुली येथे गेले. तेथे रितिक भिडे, सोहेल आमीन पिंजारी भेटले. सोहेल पिंजारी याने त्याला ऑनलाईन अकाउंटला दोन हजार रुपये टाकून द्या. तत्काळ गाडी देता, असे सांगितले. त्यानंतर अनिल माळी याने पैसे ट्रान्सफर केले.

 

त्यावर तुमची गाडी केशरानंद पेट्रोल पंपासमोर लावली असल्याने त्यांनी सांगितले. याबाबत अनिल याने दोंडाईचा पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर काही तासातच पोलिसांनी चोरट्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी रितिक भिडे, सोहेल आमीन पिंजारी, समीर नाजिम पिंजारी, फैजान निसार पिंजारी व असगर सलीम उर्फ सुफा शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश मोरे करीत आहे.

 

ही कामगिरी दोंडाईचा पोलीस ठाण्याचे प्रभारी परिविक्षाधीन सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिनेश मोरे, संजय चव्हाण, संजय गुजराथी, विनायक खैरनार रोहिदास पावरा, योगेश पाटील आदींनी केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here