रांची येथे सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश

sex-racket

रांची – झारखंडची राजधानी रांची येथील अरगोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका फ्लॅटमध्ये सेक्स रॅकेट सुरू होतं. पोलिसांच्या पथकाने छापे मारून रॅकेटचा भंडाफोड केला. फ्लॅटमधून तीन महिलांसह आणखी एकाला अटक केली आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून ठोस माहिती मिळाल्यानंतर बडे मासे गळाला लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

 

अरगोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अपार्टमेंटमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांमार्फत मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा मारला. तेथून तीन महिलांसह चौघांना अटक केली. पोलिसांनी फ्लॅटमधून दारू, सिगारेट आणि अन्य आक्षेपार्ह वस्तू हस्तगत केल्या आहेत. अटक केलेले चौघेही वेगवेगळ्या परिसरातील आहेत. पोलीस चौकशी करत असून, सर्वांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

 

रांची येथे पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याआधी याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका फ्लॅटमध्ये सेक्स रॅकेटशी संबंधित तीन महिला आणि इतर सात जणांना अटक केली होती. मिळालेल्या माहितीनुसार व्हॉट्सअॅच्या माध्यमातून या सेक्स रॅकेटशी संबंधित लोक संपर्कात होते. या रॅकेटशी अनेक बड्या लोकांचा संबंध असल्याची चर्चा आहे. पोलीस चौकशीत हे बडे मासे गळाला लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here