दोंडाईचा येथे अभिषेक जिनींगला भीषण आग…

abhishek-jinig
  • उपनराध्यक्ष रवी उपाध्ये यांचे आगीत पंचवीस लाखाच्या आत नुकसान…
  • नगरसेवकांसोबत नुकसानीची सरत्या वर्षातील चौथी घटना….

दोंडाईचा (प्रतिनिधी) – येथील नगरपालीकेचे विद्यमान उपनराध्यक्ष रवीन्द्र उपाध्ये यांच्या धुळे रोडवर असलेल्या अभिषेक जिनींगमध्ये आज (दि.२) सकाळी अचानक कपाशीच्या गठानांना आग लागली आहे. यावेळी वेळेवर कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना आग लागल्याचे प्रथम लक्षात आले. त्यांनी वेळ न गमावता लगेच जिनींगचे मालक, उपनगराध्यक्ष रविन्द्र उपाध्ये यांना घटनेची माहिती दिली. त्यांनीही लगेच दोंडाईचा फायर फायटरची मदत घेतली व काहीवेळात आगीवर नियंत्रण मिळवले. तरी हया आगीत कपाशीचे पंचवीस लाखाच्या आत नुकसान झाल्याचा अंदाज उपनगराध्यक्ष रवीन्द्र उपाध्ये यांच्यासह उपस्थितांनी लावला असल्याचे लोकांमध्ये बोलले जात आहे. याबाबत उशिरापर्यंत दोंडाईचा पोलीस स्टेशनमध्ये अग्नी उपद्रव्यापची घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

 

 

दोंडाईचा पालिकेचे उपनराध्यक्ष रवींद्र उपाध्ये यांचे धुळे रोडवर कपाशी खरेदीचे अभिषेक जिनींग अँन्ड प्रोसेसिंग केन्द्र मागील तेरा वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी नियमित कार्यांन्वित आहे. ह्यावर्षीही कोरोना पाश्वभुमीवर उशिरा का असेना सरकारच्या आदेशाने खाजगी कपास खरेदी केन्द्रात शेतकऱ्याची कपाशी सरकारी भावात खरेदीचे (सी.सी.आय.) केन्द्र सुरु करण्यात आले. म्हणून येथील अभिषेक जिनींगमध्येही शेतकरी आपली कपाशी विक्री करण्यासाठी चांगली लाईन लावून उभे रहात आहे.abhishek-jinig-fire

आज ह्या अभिषेक जिनींगमध्ये सकाळी अकरा सव्वा अकराच्या सुमारास कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना कपाशीच्या गठानींना आग लागल्याचे प्रथम लक्षात आले. त्यांनी लगेच जिनींग मालक व उपनराध्यक्ष रवींद्र उपाध्ये यांना घटनेची माहिती दिली. रवी उपाध्ये यांनी लगेच दोंडाईचा, शिंदखेडा, शहादा येथील अग्नीशमन दलाला माहिती देत, ताबडतोब पाचारण करण्यास सांगितले. यावेळी पत्र्यांच्या शेडमध्ये प्रत्येकी एकशे सत्तर किलो वजनाचे दीडशे ते दोनशे गठान लावलेले होते.त्याची अंदाचे वीस हजार रूपये किंमत धरली जात आहे. जे अग्निशमन दल येणाच्या अगोदर भस्म झाले. तरी स्थानिक फायर फायटर वेळेवर आल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले.यावेळी घटनास्थळी दोंडाईचा नगरपालीकेचे बांधकाम सभापती निखील राजपूत, भाजपा शहराध्यक्ष प्रवीण महाजन, नगरसेवक चिरंजीव चौधरी, कृष्णा नगराळे आदी उपस्थित होते.

 

 

ह्यावर्षी जसे देशावर कोरोनाचे संकट थैमान घालत आहे. तसे कोरोना काळात येथील अनेक नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांनी लोकांना दिसेल अशा, उघड्या डोळ्यांनी, सढळ हातांनी, गावातील गोर-गरिबांना अनेक दिवस अन्नधान्यासह इतरही वस्तूंची अनमोल मदत केली आहे. याकाळात अक्षरशः स्थानिक लोकप्रतिनिधींकडून मदतीचा ओघ वहात होता. जे गरीब आजही यांचे उपकार विसरू शकत नाही आहे. तरी मागील दोन तीन महिन्यांपासून यांच्यातीलच दानशुर नगरसेवकांवर संकटांची मालिका सुरु आहे. fire-at-abhishek-jinig
एकाची तीन लाखाची बुलेट चोरली गेली. दुसऱ्या घटनेत एक स्वीकृत नगरसेवक यांच्या मीलमधुन अक्षरशः चोरांनी बासमती तांदुळाचे ब्यांनऊ कट्टे रात्रीच्या अंधारात चारचाकी गाडी लावून वाहले. तिसऱ्या घटनेत माजी शिक्षण सभापती व नगरसेवक यांच्या धुळे रोडवरीलच गँस गोडावूनवरून वीस लाखाच्या आतील भरलेले गँस सिलेंडर, दोन ट्रक माल लोड होईल. एवढा माल वाहून नेण्याची हिमंत ठेवतात व आज पुन्हा आगीच्या या आघाताने एका दानशुर नगरसेवकाच्या जिनींगवर कपाशीला आग लागुन वीस ते पंचवीस लाखाचे नुकसान झाले. या सर्व घटना दोंडाईचाकरांच्यासाठी दु:खदायी आहेत. म्हणून या नगरसेवक लोकाच्या झालेल्या नुकसानीबाबत गावात सहानभूती असून, लोक हळहळ व्यक्त करत आहेत.

 

fire-at-dondaicha

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here