ठाणे (विशेष प्रतिनिधी) – बुलंद पोलीस टाइम्स्चे ठाणे येथील उपसंपादक सतीश बनसोडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुलंद पोलीस टाइम्स्च्या ठाणे कार्यालयाचे आज (दि.२) मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन व दिनदर्शिका प्रकाशन करण्यात येणार आहे.
पोलिस व जनतेतील संवाद साधण्याचे महत्वपूर्ण कार्य करण्यासोबतच विविधांगी बातम्या व जनजागृतीपर लेखांचे प्रकाशन करणाऱ्या बुलंद पोलिस टाइम्स्चे ठाणे कार्यालयाचा शुभारंभ व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आज (दि.२) सायंकाळी ६ वाजता दिप प्लाझा अपार्टमेंट, अंबिका दर्शन, रामचंद्र वैती नगर येथे होणार आहे. उद्घाटन सोहळ्याला उद्घाटक म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त वागळे इस्टेट जयंत बजबळे व बुलंद पोलिस टाइम्स्चे मुख्य संपादक सुनिल पाटील हे राहणार असून, उद्घाटन सोहळ्यास ठाणे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे, आमदार रविंद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, ठाणे महानगरपालिकेचे महापौर नरेश मस्के, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सौ.मृणाल पेंडसे, नगरसेवक एकनाथ भोईर यांची प्रमुख उपस्थिती आहे.
याप्रसंगी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस उपायुक्त परिमंडळ ५ विनयकुमार राठोड, पोलीस उपायुक्त शाखा ठाणे बाळासाहेब पाटील, श्रीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे, वागळे इस्टेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता ढोले, वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिलकुमार मांगले यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
तरी बुलंद पोलिस टाइम्स्च्या वाचकांनी, जाहिरातदार व हितचिंतकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे बुलंद पोलीस टाइम्सतर्फे उपसंपादक सतीश बनसोडे यांनी आवाहन केले आहे.







