पुणे (उपसंपादक अमोल सोळंके) – अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी कोल्हापूर चित्रपट व्यवसाय वर्धापन दिन सोहळा मंगळवार दि 1 डिसेंबर 2020 रोजी ठीक सकाळी 10 वाजता कॅमेरा मानस्तभं ,खरी कॉर्नर, कोल्हापूर येथे साजरा करण्यात आला.
यावेळी जेष्ठ कामगार बाळकृष्ण बारामती व पंडित बोगाळे, तसेच श्रीमती विजयमाला पेंटर आणि संस्थेचे प्रभारी अध्यक्ष व उपाध्यक्ष धनाजी यमकर यांच्या हस्ते कलामहर्षी कै.बाबुराव पेंटर,कै.आनंदराव पेंटर यांच्या प्रतिमेचे व कॅमेरा मानस्तंभाचे पूजन करण्यात आले. 
यावेळी संचालक रणजित (बाळा) जाधव, सतीश बिडकर, स्वीकृत संचालक रवींद्र गावडे तसेच मराठी चित्रपट व्यवसायातील कलाकार तंत्रज्ञ व मान्यवर उपस्थित होते








