नवी मुंबईतील वाशी खाडी पुलावरुन महिलेने मारली उडी..!!

vashi-police

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – रविवारी २९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२:४० च्या दरम्यान वाशी खाडी पुलावरुन मध्यभागी एका महिलेने पाण्यात उडी मारली आहे असा नियंत्रण कक्षाकडून संदेश प्राप्त झाला. त्यावरून वाशी पोलिस ठाणे बीट मार्शल-१ चे कर्मचारी, वाशी चेक पोस्ट वरील पोउनि गुरव व कर्मचारी, सागरी सुरक्षा शाखेचे कर्मचारी यांनी लगेचच तत्परतेने स्थानिक मच्छीमार जीव रक्षक महेश अशोक सुतार वय ३७ वर्ष रा. वाशी गाव यांचे स्वतःच्या मालकीच्या फिशिंग बोटच्या मदतीने समुद्रात जाऊन पाण्यात बुडणाऱ्या महिलेस पाण्यात उडी मारुन महिलेस पाण्यातून वाचवून बोटीतून बाहेर आणले.

 

सदर महिलेकडे चौकशी करता तिचे नाव हिराबेन लक्ष्मीदास कटरमल (भानुशाली) वय ४५ वर्ष, रा. ठि. हिमालय सोसा. असल्फा, घाटकोपर असे सांगून तिच्या मुलीस वाशी येथे भेटण्यासाठी आल्याचे सांगितले. सदर वेळी पुलावरून फुले टाकताना चक्कर आल्याने पाण्यात पडल्याचे सांगितले.

 

सदर महिलेचे नातेवाईक हिरज कानजी कटारमल (भानुशाली) वय ४३ वर्ष पो.ठाण्यात हजर झाले असता त्यांनी सदर महिला त्यांच्याकडे कोपरखैरणे येथे भेटण्यासाठी येत असल्याचे सांगितले. सदर महिलेची प्रकृती व्यवस्थित असून त्यांची वैद्यकीय तपासणी करिता मनपा वैद्यकीय रुग्णालय ऐरोली येथे पाठविण्यात आले व सदर महिलेचे पती लक्ष्मीदास कानजी कटारमल व मुलगा जिग्नेश कटारमल यांचे हवाली करण्यात आले आहे. वाशी पोलीस तसेच सागरी सुरक्षा शाखेचे पोलीस आणि स्थानिक मच्छीमार यांनी तत्परतेने कारवाई केल्याने या महीलेचा जीव वाचला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here