अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पुण्यातील आरोपींना २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

court

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – वडिलांसोबत दारू पिण्यासाठी येणाऱ्या दोघांनी १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्यांना पोक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरवून २० वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

 

 

दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्यात यावी, तसेच मनोधैर्य योजनेअंतर्गत सुद्धा पीडित मुलगी नुकसानभरपाई मिळवू शकते, असे निकालात नमूद करण्यात आले आहे. विशेष न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

 

 

गणेश उर्फ सिद्धू विलास भालेराव ( वय – २७), सुधीर छत्रभूज गायकवाड ( वय -२७, रा. मुळानगर, जुनी सांगवी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणी पीडित १२ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आजीने फिर्याद दाखल केली होती. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील सुनील मोरे यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. त्यांनी सात साक्षीदार तपासले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here