पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून विवाहितेवर सामूहिक बलात्कार

kalyan-police-station

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून दोन नराधमांनी विवाहितेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण तालुक्यातील कांबा परिसरात घडली आहे.

 

 

याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात अत्याचारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून, पोलिसांनी दोन्ही नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत. गौतम काने (वय – 40) आणि बलराम गायकवाड (वय 28) अशी या आरोपींची नावे आहेत.

 

 

पीडित विवाहिता पतीसह कल्याण तालुक्यातील कांबा परिसरात राहते. रात्रीच्या सुमारास ती घरी एकटी असल्याचे पाहून त्याच परिसरात राहणाऱ्या या आरोपींनी पीडितेला पिण्यासाठी पाणी मागण्याच्या बहाणा केला. त्यावेळी पीडिता पाणी आणण्यासाठी गेली असता, तिच्या मागेच ते जबरदस्तीने घरात घुसले. त्यांनतर या दोन्ही नराधमांनी दारूच्या नशेत तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीनुसार कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता 5 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here