धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – महाराष्ट्र ग्रंथालय सेनेचे प्रदेश कार्यकारिणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र यांनी नुकतीच जाहीर केली. त्यात धरणगाव येथील माजी नगराध्यक्ष प्रा. पी.एम.पाटील. यांची महाराष्ट्र ग्रंथालय सेनेच्या उपप्रमुखपदी निवड करण्यात आली.त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्हा शिवसेना जिल्हा बैठकीत यांचा शाल देऊन सत्कार केला.
याप्रसंगी आ.चिमणरावजी पाटील, आ.किशोर पाटील जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, जि.प.सदस्य गोपाल चौधरी, माजी महापौर विष्णू भंगाळे, गटनेते सुनील महाजन, जळगाव शहर प्रमुख शरद तायडे, प.स सभापती मुकुंद नन्नावरे, नगराध्यक्ष निलेश चौधरी, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, विश्वनाथ पाटील,जळगाव जिल्हा शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व प.स सभापती नंदू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.प्रदेश अध्यक्ष श्री देशमुख सौ शिल्पा सरपोद्दार यांनीसुद्धा निवडीबद्दल अभिनंदन केले.







