शहादा येथे क्षयरोग व कुष्ठरोग शोध अभियानाच्या जनजागृतीचा शुभारंभ

shahada-medical-abhiyan

शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – क्षयरोग आणि कुष्ठरोग निर्मुलन अभियानाबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी हिरवी झेंडी दाखवून जनजागृती मोहिमेचा शुभारंभ केला.

 

यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, डॉ.राजेश वळवी, सहायक संचालक डॉ. अभिजीत गोल्हार आदी उपस्थित होते.

 

अधिक क्षयरोग रुग्ण आढळणाऱ्या भागात जनजागृतीवर भर देण्यात यावा आणि रुग्णांना वेळेवर उपचाराबाबत माहिती देण्यात यावी असे यावेळी डॉ.भारुड यांनी सांगिले. चित्ररथ ग्रामीण भागात करणार असून ध्वनिक्षेपक आणि फलकाद्वारे क्षयरोगाबाबत माहिती देण्यात येणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here