पारोळा येथे ब्लेडने कापला तरूणाचा गळा

parola-blade-murder

पारोळा (प्रतिनिधी) – येथील तलाव गल्लीत राहणारा शहरातील तलाव गल्ली कॉर्नर जवळ नितीन (सोनू) सुरेश पाटील (२२) हा उभा असतांना समोरुन आलेल्या एका युवकाने (अजय नामक पारोळा येथील साईबाबा मंदिराच्या मागे राहणारा) ने सोनुच्या गळ्यावर ब्लेडने वार केले आहे.

 

 

त्यास घटनास्थळावरून नातेवाईकांनी पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यावर डॉ.योगेश साळुंखे, डॉ. राजेश वालडे दीपक सोनार, दीपक पाटील आदींनी प्रथमोपचार करून 108 रुग्णवाहिकेत डॉ.प्रवीण ठाकरे व चालक रोशन पाटील यांनी पुढील उपचारार्थ धुळे येथे रवाना करण्यात आले आहे याबाबत अद्यापपर्यंत पोलिसात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here