नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – खांडबारा ता.नवापूर येथील महावितरणच्या कार्यालयातुन २ लाख ४२ हजार ९६८ रूपयांचे शासकिय विजमिटर लंपास झाल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी अज्ञाताविरूध्द विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील महावितरणचा हर्षल वळवी यांनी चार्ज घेतल्यानंतर २५१ शासकिय विजमिटर आढळुन आले नाहीत.त्यानंतर नवापुर, नंदुरबार व खांडबारा विज वितरण कार्यालय येथे शोध घेतला असता ते न मिळाले नाही.
अज्ञात इसमाने दि.२७ फेब्रुवारी २०१८ ते २९ ऑक्टोंबर २०२० दरम्यान महावितरणच्या कार्यालयातुन २ लाख ४२ हजार ९६८ रूपयांचे २५१ शासकिय विजमिटर लंपास केल्याप्रकरणी हर्षल सरवसिंग वळवी रा.मालपुर, ता.जि.नंदुरबार यांच्या फिर्यावरून विसरवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास गुन्हा तपास पोउनि बि,व्हि, बैसाणे करीत आहेत.







