मुंबई (चित्रपट विभाग प्रतिनिधी गणेश तळेकर) – अभिनेता अनिल कपूरने त्याच्या बाबतीत सुरू असलेल्या चर्चेला पूर्ण विराम दिला असून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचा खुलासा त्याने केला आहे. अनिल कपूरने आपल्या ट्विटरवर लिहिलंय, कोणत्याही अफवा पसरू नयेत म्हणून सांगतो की, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तुम्ही करीत असलेल्या काळजीबद्दल आणि शुभेच्छांबद्दल आपला आभारी आहे.
अनिल कपूरसोबत ‘जुग जुग जियो’ या राज मेहता दिग्दर्शित चित्रपटाचे शूटिंग करणारे वरुण धवन आणि नीतू कपूर कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. मात्र अनिल कपूर यांच्या टेस्टबाबत स्पष्टता नव्हती. मात्र त्यांनी आपण पॉझिटिव्ह झाल्याचे सांगितल्यानंतर आता ही बातमी कन्फर्म झाली आहे. ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाचे शूटिंग थांबविण्यात आले आहे.







