उत्तरप्रदेशात १३ वर्षीय मुलीवर लोको पायलटने केला बलात्कार; व्हिडीओ शूट करून केले ब्लॅकमेल

rape-video-shoot

कानपूर – १३ वर्षीय मुलीवर बलात्कार करून त्याचा व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी पोलिसांनी लोको पायलटला अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली.

 

 

मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर प्रयागराज येथील अभिषेक पटेल याला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मुलीने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला होता. त्यानंतर पालकांना धक्काच बसला. त्यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली.

 

 

आरोपी अभिषेकने मुलीला प्रलोभन दाखवून तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ काढला. त्यानंतर त्याने मुलीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तसेच याबाबत कुणाकडे वाच्यता केली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असे धमकावले, असे तिच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी अभिषेकला गुरुवारी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्याचा मोबाइल फोन पोलिसांनी जप्त केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here