मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – भिवंडी शांतीनगर परिसरात मोठया प्रमाणात मोटार सायकल चोरीच्या गुन्हयामध्ये वाढ होत असल्याने मोटार सायकल चोरींना प्रतिबंध व्हावा, असे गुन्हे उघडकीस आणुन अशा गुन्हयांचे समुळ नष्ट करावे असे मा. पोलीस उपायुक्त श्री योगेश चव्हाण सो, परि. २ भिवंडी यांनी परिमंडळातील प्रत्येक पोलीस ठाणेतील अधिकारी व अंमलदार यांना आपआपले पोलीस ठाणे हददीत सतर्क गस्त करून असे गुन्हे करणारे गुन्हेगारांना वेळीच जेरबंद करण्याबाबत आदेश दिले होते.
त्यानुसार मा. सहा. पोलीस आयुक्त श्री प्रशांत ढोले सो पुर्व विभाग भिवंडी, मा वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री शितल राउत शांतीनगर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाप्रमाणे शांतीनगर पोलीस ठाणे हददीत तपास पथकाचे पोउपनिरि जाधव व कर्मचारी यांनी गुप्त बातमीदारा मार्फत माहीती प्राप्त करून कारवाई करीत मोटार सायकल चोरी करणारे २ विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन ठाणे आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटार सायकल चोरीचे एकुण ८ गुन्हे उघडकीस आणुन एकुण २,१५,०००/रूपये किंमतीच्या ८ मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त अनिल कुभारे, पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण परि. २ भिवंडी, सहा. पोलीस आयुक्त प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक शितल राउत शांतीनगर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक (प्रशा) किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) नितीन पाटील, पोउपनिरि निलेश जाधव, सपोउपनिरि शेळके, पोना./१८९९ वडे, पोना/१०५१ इथापे, पोशि १९९७/इंगळे, पोशि/६४३ कापरे, पोशि/४७१४ पाटील या शांतीनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.







