चंद्रपूर – वणी पोलीस ठाण्याअंतर्गत मागील पाच वर्षात जब्त करण्यात आलेली ७३ लाखांची दारू एमआयडीसी परिसरात रोडरोलर फिरवून नष्ट करण्यात आली. वणी न्यायालयाच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली.
वणी लगत चंद्रपूर जिल्हा आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असल्यामुळे वणी येथून मोठ्या प्रमाणावर दारू तस्करी करण्यात येते होती. गेल्या पाच वर्षात पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणारी ७३ लाखांची दारू जप्त केली होती. ही दारू नष्ट करण्यासाठी न्यायालयाची परवानगी मागितली होती.
सर्वाधिक अवैध दारू तस्करी ही यवतमाळ जिल्ह्याच्या वणी भागातून चंद्रपूर येथे करण्यात येते. मात्र, दारू ही चंद्रपूर जिल्ह्यात केलेल्या दारूच्या तस्करीपेक्षा अत्यल्प असल्याचे बोलले जात आहे. पोलीस कितीही कर्तव्यदक्ष असले तरी दारू तस्कर हे वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करून दारू तस्करी करतात.
न्यायालयाचे आदेश वणी पोलीस ठाण्यात प्राप्त होताच तहसीलदार श्याम धनमने, ठाणेदार वैभव जाधव, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निबंधक नारायण सुर्वे, यासह इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही दारू नष्ट करण्यात आली. या कारवाईमुळे वणी पोलीस ठाण्याला २५हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले.







