पुणे (विशेष प्रतिनिधी) – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आ) रोजगार आघाडी पुणे शहराच्यावतीने गुरुवार दिं १० डिसेंबर २०२० रोजी युवकांचे प्रेरणास्थान महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (रोजगार आघाडी) चंद्रकांतदादा जगताप यांच्या वाढदिवसा निमित्त मधुबन मतीमंद बहुविकलांग मुलांची सामाजिक संस्थेस धान्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दि.९-१२-२०२० रोजी ठीक दु १२ वा. चैतन्यनगर गिरीनगर सोसायटी बंगलो नं ३१, बिल भरणा केंद्र ,धनकवडी, पुणे ४३ येथे हा कार्यक्रम होणार असून, हा कार्यक्रम हरेशभाई देखणे (महाराष्ट्र प्रदेश सचिव रिपाई) शुभहस्ते पार पडणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती संगीताताई आठवले, अध्यक्षा पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी, प्रभाकर निकम, उपाध्यक्ष रोजगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश, पश्चिम महाराष्ट्र महिला आ.रिपाई, श्यामभाऊ सदाफुलें, सरचिटणीस पश्चिम महाराष्ट्र रोजगार आ., विष्णूदादा भोसले जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड,पुणे, निकिताताई गायकवाड, अध्यक्षा जनविकास महासंघ, कैलास केदारी, जिल्हाध्यक्ष रोजगार आघाडी पुणे, सदानंद भाऊ कडलक, उपाध्यक्ष पुणे शहर रोजगार आघाडी, मीना उर्फ माही ठाकूर, सचिव पुणे शहर महिला रोजगार आ., रवी धाबे, उपाध्यक्ष पुणे शहर रोजगार आ., सचिन देवकुळे, उपाध्यक्ष पुणे शहर रोजगार आ., नितीन गायकवाड, खेड ता.अध्यक्ष रोजगार आ., अँड.अरुण सोनवणे, अध्यक्ष पिंपरी-चिंचवड शहर रो.आ. इ. उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक सुनिल(दादा) जाधव, अध्यक्ष पुणे शहर रोजगार आघाडी रिपाई(आ), संस्थापक/अध्यक्ष क्रांतिवीर विचार संघ महाराष्ट्र राज्य हे आहेत.







