चीनमध्ये खाणीतील अपघातात 23 कामगार ठार

chaina-accident

बीजिंग – चीनमधील एका खाणीत कार्बन मोनोऑक्साइडची पातळी धोकादायक पातळीवर पोहोचल्यानंतर 23 खाण कामगारांचा मृत्यू झाला. तर, एकाला वाचविण्यात यश आले आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. चोंगकिंग नगरपालिकेच्या हद्दीत ही दुर्घटना घडली.

 

सिन्हुआ या वृत्तसंस्थेनुसार, हा अपघात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास योंगचुआन जिल्ह्यातील डायओसुईदोंग येथील बंद असलेल्या कोळसा खाणीत घडला. दोन महिन्यांपूर्वी ही खाण बंद झाली होती. घटनेवेळी कामगार खड्ड्यात उपकरणे उघडत होते. त्या वेळी खड्ड्यात 24 मजूर होते.

 

कार्बन मोनोऑक्साइडची पातळी वाढल्यानंतर सर्व मजूर खाणीतच अडकले. त्यांना वाचवण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू झाले. मात्र, या अपघातात 23 कामगारांना जीव गमवावा लागला. तर, एकाला वाचवण्यात आले आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी पुढील तपास केला जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here