कॉंग्रेस माजी तालुकाध्यक्षावर येवतीत हल्ला; दोघे अटकेत

bodwad

बोदवड (प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी) – तालुक्यातील येवती येथील माजी सरपंच व कॉंग्रेसचे माजी बोदवड तालुकाध्यक्ष पुरूषोत्तम देवराम पाटील ऊर्फ बाळू पाटील यांच्या वर चाकू हल्ला झाल्याची घटना 7 रोजी सायंकाळी घडली या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही संचयीताना सोमवारी रात्रीच अटक केली. माजी सरपंच पाटील हे सोमवारी सायंकाळी येवती जामठी रस्त्यावर साईबाबा मंदिरात गेले होते.

 

आरती संपल्यानंतर संचयीत गजानन मुढे रा. शेगाव जि. बुलढाणा यांनी त्यांच्यावर चाकू हल्ला केला. पुरुषोत्तम पाटील यांच्या मानेवर हातावर पाठिवर आणी बोटावर चाकू ने वार केले ही घटना मंदीरात उपस्थित काही जणांच्या लक्षात येई पर्यंत संशयित पसार झाला होता. उपस्थितीत जखमी पाटिल बोदवड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून जळगावला हलविण्यात आले.

 

या घटनेची माहिती मिळताच बोदवड पोलिस यांनी संशयितांचे शोध सुरू केला घटनेच्या आधी मंदीराबाहेर दुसरा संचयीत सचिन लांडे दुचाकी घेऊन उभा होता हल्ला नंतर संचयीत मुंडे यांच्या मागे बसून पसार झाला होता. मात्र सोमवारी रात्री 12. 30 दोन्ही संचयीतानी मोताळा येथून ताब्यात घेण्यात आले. संचयीत मुंडे हा जखमी पाटिल यांचे चलते भाऊ रमेश पाटील यांचा जावई आहे. बोदवड चे पोलीस अधीक्षक राहुल यांनी या प्रकरणी पंचनामा केला आहे

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here