महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला रणजीत सिंह डिसले गुरुजींचा सन्मान

raj-thakre

मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – मुंबई येथे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ग्लोबल टीचर पूरस्कार प्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या त्यांच्या माता-पित्यासह सन्मान केला. यावेळी उपस्थित बाळा नांदगावकर, दिलिप (बापु)धोत्रे, अविनाश अभ्यंकर, प्रशांत गिड्डे, हरिभाऊ जाधव, प्रविण देशमूख, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

तसेच युनेस्को आणि लंडनच्या वार्की फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ग्लोबल टीचर पूरस्कार मिळाल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो. यावेळी यशामुळे तमाम महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतो , असे डिसले गुरूजीं बद्दल गौरवोद्गार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढले. मुंबई येथे सोलापूर जिल्हा परीषदेचे प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ग्लोबल टीचर पूरस्कार मिळाल्याबद्दल राज ठाकरे यांनी त्यांचा व त्यांच्या माता-पित्यांचा सन्मान केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलिप धोत्रे, अविनाश अभ्यंकर, तसेच सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, हरिभाऊ जाधव, प्रविण देशमूख, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

तसेच यावेळी राज ठाकरे यांनी डिसले कुटुंबियांची आस्थेने चौकशी केली. शिवाय डिसले गुरुजींच्या पुढील शैक्षणिक कार्यात आवश्यक तेथे मदत करण्याचे अभिवचन दिले. उपस्थित सर्वच मान्यवरांनी डिसले गुरुजींनी केलेल्या कार्याचे कौतूक करुन त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल अभिनंदन केले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here