भिवंडीत सोनपाड्यात भंगार गोडाऊनमध्ये अग्नितांडव

bhiwandi-fire

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – डोंबिवलीच्या कल्याण-शिळ रस्त्यावरील सोनारपाडा परिसरातील भंगार गोडाऊनमध्ये आग लागून स्फोट झाल्याचा प्रकार घडला आहे. या आगीचे कारण अस्पष्ट असून आग लागल्यानंतर स्फोट झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

 

 

घटनेची माहिती मिळताच अग्निशमनच्या दोन गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या. सध्या आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काहीच वेळात आगीने रौद्र रुप धारण केल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ पसरले आहेत. आगीची भीषणता इतकी आहे की, संपूर्ण परिसरात लोट पसरत आहेत. मात्र आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. तसेच आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही.

 

 

भिवंडीत आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शॉर्ट सर्किट होईल अशी परिस्थिती टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कार्य सुरू आहे. यानंतरच आग लागण्याच्या मुख्य कारणाचा खुलासा होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

 

भिवंडी शहरात रात्री सुमारास भीषण आगीची घटना घडली. फातिमानगर परिसरातील एका कापड गोदामाला बुधवारी पहाटे एकच्या सुमारास ही आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या आणि तीन टँकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दोन तासांमध्ये या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले फातिमानगर हा दाट वस्तीचा परिसर आहे. या परिसराच्या मधोमध असलेल्या कापड गोदामाला आग लागली होती. अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचेपर्यंतच लाखो रुपयांचे कापड आणि धाग्याचे कोम जळून खाक झाले. दाटीवाटीच्या वस्तीत असा प्रकार पुन्हा घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here