प्रियकरासोबत संसार थाटण्याचे स्वप्न बघणाऱ्या तरुणीच्या हाताची बोटे वडील आणि भावाने छाटली

cut-fingure

बंगरुळू – दोन वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध जुळले. प्रियकरासोबत सुखाचा संसार थाटण्याची स्वप्ने ती पाहू लागली. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुलीचे वडील आणि भावाला ते मान्य नव्हते. त्यांच्या प्रेमाला त्यांचा विरोध होता. यावरून वाद झाला. बापाने आणि भावाने तिला पकडले आणि तिच्या हाताची चार बोटे कापली. कर्नाटकमधील चामराजनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, धनलक्ष्मी असे २४ वर्षीय तरुणीचे नाव आहे. ती आणि सत्या (वय २८) हे दोघेही चामराजनगर जिल्ह्यातील हनुर तालुक्यातील पीजी पाल्या गावात राहतात. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. धनलक्ष्मीच्या कुटुंबीयांकडून संमती मिळाल्यानंतर लग्न करण्याचा त्यांचा विचार होता. मात्र, तिच्या पालकांचा या प्रेमसंबंधांना तीव्र विरोध होता.

 

एका मेडिकल स्टोरजवळ तिच्या वडिलांनी आणि भावाने तिला पकडले. त्यांच्यात या प्रकरणावरून वाद झाला. त्या दोघांनी तिला घट्ट पकडून ठेवले आणि तिच्या हाताची चार बोटे कापली. यात ती जखमी झाली. तेथून ये-जा करणाऱ्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी हनुर पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here