पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पोलिसांच्या जाळ्यात

petrol-pump-gang

पुणे (उपसंपादक सुनिल भोसले) – पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला कोथरूड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन दुचाकी, घातक शस्त्रे जप्त केली आहेत. डुक्कर खिंडीजवळ असलेल्या उरितनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली.

 

समीर अंकुश पासरलकर (वय २३, रा. केळेवाडी, कोथरूड), प्रमोद बळीराम साठे (वय २९, रा. बालगुडी, मुळशी), हृषीकेश राजेंद्र ठाकूर (वय २१, मातरवाडी, मुळशी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिस नाईक विजय कांबळे यांनी या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 

कोथरूड पोलिस हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना डुक्कर खिंडीजवळील उरितनगर टेकडीलगत असलेल्या एका पेट्रोलपंप परिसरात टोळक्याची संशयास्पद हालचाल त्यांना दिसली. पोलिसांनी तेथे जाऊन समीर, प्रमोद, हृषीकेश यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे घातक शस्त्रे आणि दोन दुचाकी मिळून आल्या. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक संतोष पाटील अधिक तपास करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here