१३ वर्षीय मुलीवर अत्याचार प्रकरणी आचाऱ्याला १० वर्षांची शिक्षा

arrest

पुणे (उपसंपादक सुनिल भोसले) – एका १३ वर्षीय अल्पवयीन विशेष आणि एचआयव्ही पॉझिटीव्ह असलेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका आचाऱ्याला कोर्टाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

 

राजू उर्फ दशी इमानसिंग तमंग ( वय ५३, रा. पिंपळे निलख) असे आरोपीचे नाव आहे. जून २०१८ मध्ये या प्रकरणी फरासखाना पोलिसांकडे मुस्कान या संस्थेतर्फे तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपीवर कारवाई केली. या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी पाहिले. तर अॅड. गौरव जाचक यांनी सरकार पक्षाला सहाय्य केले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here