हेतल कोल्हे हिला शास्त्रीय कला गायन क्षेत्रातील विशेष गुण प्राप्त

hetal-kolhe

भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – येथील सेंट अलॉयसियस हायस्कूलची विद्यार्थिनी हेतल कोल्हे ही मार्च २०२० मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत ९६.६०% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. तथापि शास्त्रीय कला, गायन या क्षेत्रातील विशेष परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिले जाणारे सवलतीचे गुण तिला देण्यात आलेले नव्हते.

 

वास्तविक यापूर्वीच विद्यार्थ्यांच्या हक्काचे व कष्टाचे असलेले हे गुण तिला मिळणे अपेक्षित होते परंतु अनवधानाने हे गुण देण्यात आलेले नव्हते. यासंदर्भात नाशिक विभागीय मंडळाशी श्री भालचंद्र पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून तिला हे विशेष दहा गुण प्राप्त झालेत. त्यामुळे तिची एकूण टक्केवारी ९८.६०% अशी झाली आहे. त्यामुळे तिला शहर व तालुक्यातून देखील प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. तिच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सेलमा व शिक्षक वृंद यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here