मुंबई (प्रतिनिधी रवि गवळी) – मालाड खडकपाडा येथे काल रात्री छापा टाकून ५७ किलो पेक्षा जास्त वजनाचा गांजा जप्त केला. दरम्यान, या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. उप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांना खडकपाडा जनरल ऐ के वैध मार्ग मालाड ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर गांजा अमली पदार्थ असल्याची माहिती प्राप्त झाली माहिती होती.
या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस उपायुक्त डॉ स्वामी परिमंडळ 12 यांच्या मार्गदर्शना खाली सदर कारवाई दिंडोशी पोलीस ठाणेचे वपोनी कांबळे यांचा नेतृत्वखाली कार्यवाही करण्यात आली आहे.अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून सदर कारवाई, पोलीस उपआयुक्त डॉ.स्वामी परिमंडळ १२. सहा पोलीस आयुक्त सुभाष जाधव दिंडोशी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोशी पोलीस ठाण्याचे वपोनि कांबळे व पोनि बाळकृष्ण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पो.ना.क.९८०२४० /बांगर, पो.शि.क.०४०५९१ / घुगे, पो.शि.क.०८०१७१ / पाटील, पो शि.क,१११३४८/ देवघरे, पो.शिक ०९३५९०/वाघमारे .पोउपनि फड, यांचा पथकाने साधारण २१:०० वा सुमारास खडकपाडा, जनरल ऐ.के.वैद्य मार्ग,मालाड पु मुंबई या ठिकाणी असलेल्या एका गॅरेजमध्ये छापा टाकून इसम नामे तबारक हमिद सय्यद २२ वर्षे व मुश्तफिजुर रियाकतअली शेख २३ वर्षे यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून ५७ किलो वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. तसेच ताब्यात घेतलेल्या इसमाविरुध्द दिंडोशी पोलीस ठाणे वि.स्था.खक ३६/२०२० कलम ८ (क), २०(क),२९ एनडीपीएस अॅक्ट १९८५ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. आरोपींकडून मिळून आलेला गांजा हा अंमली पदार्थ त्यांनी मुंबई शहर व उपनगरातील परिसरात लोकांना विक्रीकरिता आणला असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे.







