नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – खारघर परिसरातील एक महिलेला गेले 10 वर्षापासुन लग्नाचे अमिष दाखवुन इच्छेविरुद्ध जबरदस्तीने वारंवार बलात्कार केला म्हणुन तक्रार अर्ज वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी याचेकडे केला होता.
त्या अर्जाची सखोल चौकशी महिला पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी केली त्यात तथ्य आढळून आल्याने खारघर पोलीस स्टेशन ला भादवि 376(2)(N),406,313,323,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल केला त्यातील थोडक्यात हकिगत अशी की यातील फिर्यादी हे खारघर परिसरातील महिलांना योगा शिकवत असे तिची रोहित अवनी सिंग वय 35 पटेल पॅराडाईज खारघर याचेशी ओळख झाली पुढे त्याचे रूपांतर मैत्रित झाले त्यानंतर त्याने लग्नाचे अमिष दाखवुन सदर महिलेला पतीपासुन घटस्फोट घ्यायला लावून त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले तसेच सदर महिला धमकावून तिचेकडुन 94,50,000 रू घेतले म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हाचा तपास महिला पोलीस निरीक्षक विमल बिडवे हे करीत असुन कोणत्याही महिलेला कोणी ब्लॅकमेलिंग करत असेल तर तक्रार करावी त्याचे निरसन करण्यात येईल असे आवाहन बिडवे मॅडम यांनी केले आहे .तसेच खारघर पोलीस स्टेशन येथे महिला च्या तक्रार निवारण कक्ष ची स्थापना करण्यात आली आहे…नि संकोच पणे महिलांनी यावे किंवा कॉल करावा त्वरित मदत मिळेल, असे आवाहन करण्यात आले आहे.







