“विकेल ते पिकेल” या अभियानांतर्गत रयत बाजार शुभारंभ

विकेल-ते-पिकेल

नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – जिल्ह्यातील शहादा येथे विकेल ते पिकेल अभियानाअंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार शुभारंभ नवीन प्रांत कार्यालय प्रांगणात उपविभागीय अधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे यांच्या हस्ते करण्यात आला. शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत थेट शेतकर्यां मार्फत विक्री करण्यात यावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून विकेल ते पिकेल अभियानांतर्गत रयत बाजार अभियानाची सुरुवात करण्यात आली.

 

शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला,फळे, कडधान्य इ. विक्री करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत विविध शासकीय कार्यालयांमध्ये आठवड्यातून दोन ते तीन वेळेस शेतकऱ्यांना भाजीपाला विक्री करता येणार आहे. शेती उत्पादनाला थेट बाजारपेठ मिळवून देऊन शेतकऱ्याला जास्तीत जास्त निव्वळ नफा कसा मिळवता येईल यासाठी कृषी विभागाचा हा प्रयत्न असल्याचे मत तालुका कृषी अधिकारी श्री किशोर हडपे यांनी व्यक्त केले. दादा तालुक्यातून जवळपास 40 शेतकरी उत्पादक गटांनी या अभियानात सहभाग नोंदविला आहे.

 

तालुक्यातील ठिकाणी या रयत बाजार अभियानांतर्गत स्टॉल उभे करून शेतकऱ्यांना भाजीपाला व फळे विक्री करण्यासाठी नवीन व्यासपीठ मिळवून दिले आहे. या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपले उत्पादन विक्री करण्यासाठी प्रस्थान मिळावे यासाठी शासन सतत प्रयत्नशील असते. या अभियानातून सेंद्रिय शेतीतून उत्पादित भाजीपाला फळे व कडधान्य मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. ‘शेतकरी ते थेट ग्राहक ‘यामुळे शेतकऱ्यांना आपले उत्पादन जास्तीत जास्त नफा मिळवून विकता येणार असल्याने शेतकरी आनंदी असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

कार्यक्रमा प्रसंगी प्रांताधिकारी श्री. डॉ. केतन सिंग गिरासे ,कृषी सभापती माननीय श्री. अभिजीत पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. वि.भा.जोशी तसेच तालुका कृषी अधिकारी श्री किशोर हाडपे , मंडळ कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक तसेच शेतकरी गट यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here