नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय निकम) – जिल्ह्यातील शहादा येथे १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे सर्वा महाराष्ट्राचे लोकनेते खा.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध संघटनांमार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत.
आमदार रोहितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बंडू जावळे,प्रदेशाध्यक्ष जयंत भोसले यांनी दिलेल्या नियोजनानुसार आमदार रोहितदादा पवार फॅन्स क्लब,नंदुरबार जिल्ह्याच्या वतिने नगरपालिका शासकीय रुग्णालय,शहादा येथील परिसरात स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात आला.
सदर कार्यक्रमास शहादा नगरसेवक तथा राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष श्री चंद्रकांत पाटील,राष्ट्रवादी शहादा शहर अध्यक्ष श्री सुरेंद्र कुवर, व श्री एन डी पाटील सर व इतर मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रम आमदार.रोहितदादा पवार फॅन्स क्लब चे जिल्हाध्यक्ष श्री राजरत्न बिरारे,जिल्हाउपध्यक्ष श्री रोहित ढोडरे,जिल्हा संघटक सुरेश पाटिल,प्रशांत महाले,दिनेश पवार,अंबालाल मराठे,शुभम कुवर,सागर पानपाटील,दीपक बिरारे,आकाश पेंढारकर,करण बागले,बंटी बिरारे,रविंद्र ठाकरे आदींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यशस्वी केला.








