रावेर, यावल तालुक्यातील रस्त्यांना लागली कोरोनाची चाहुल, लॉकडाऊन काळात रस्त्यांचा डॉक्टर काही मिळेना

raver-yawal-road

संबधित जिल्हा वरिष्ठ अधिकारी, आमदार,खासदार यांचेकडून लक्ष देण्याची गरज…

रावेर ( जिल्हा प्रतिनिधी हमीद तडवी) – रावेर व यावल तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांना लागलीय कोरोनाची चाहुल,आणि लॉकडाऊन काळात रस्त्यांचा डॉक्टर काही मिळेना? ह्या रस्त्यांना घाबरताय अधिकारी आमदार,खासदार,संबधित मंञी. असे रावेर व यावल तालुक्यातील जनतेकडुन बोलले जात आहे. व गावोगावी रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत चर्चा देखील जोर धरु लागली आहे..

 

याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर त व यावल तालुक्यातील संबधित गावांचे रस्ते हे कित्येक वर्षापासुन खराब झाले असुन या रस्त्यांने काटेरी झाडेझुडपे देखील वाढले आहेत,या रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे वाहनधारक,प्रवाशी,शेतकरी, मजुर,यांना रहदारीला खुप ञास सहन करावा लागत आहे.तेही कुठपर्यंत ञास सहन करतील?शेवटी उपोषण केल्याशिवाय दुसरा उपायच नाही,असे रावेर,यावल तालुक्याच्या जनतेने पक्का निर्णय घेतला आहे. तसेच या रस्त्यांनी प्रवास करुन करुन सर्वसामान्य जनता व शेतकरी जसे हैराण झाले आहेत.त्याचबरोबर ,या रस्त्यांनी केव्हा-केव्हा गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी दवाखान्यात येजा करावी लागते,अशा गर्भवती महिलांना माञ जीव मुठीत घेऊन तारेवरची कसरत करत या फॅक्चर ,खड्ड्यांनी बहरलेल्या रस्त्यांने माञ कसातरी प्रवास करावा लागत आहे.

 

ह्या रस्त्यांचा संपुर्ण प्रकार संबधित बांधकाम विभागाचे इंजिनिअर, अधिकारी,आमदार,खासदार यांना माहिती असल्यावरही जाणीनपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संबधित गावांच्या ग्रामस्थांनी केला आहे.संबधित अधिकारी पदाधिकारी माञ बघ्याची भुमिका निभावत असुन,कोरोना माहामारीचे संकट सांगुन अधिकारी वेळ मारुन देत आहे,आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळुन त्यांच्या भावना दुखावण्याचे कार्य करीत असल्याचे चिञ रावेर व यावल तालुक्याच्या रस्त्यांबाबत पहावयास मिळत आहे,तरी कुठपर्यंत चालणार हा प्रकार? असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.आणि कधी मिळणार या रस्त्यांना जीवनदान.याकडे माञ रावेर,यावल तालुक्याच्या जनतेचे लक्ष लागले आहे.

 

रावेर यावल तालुक्यातील खड्डामय रस्त्यांची नावे-कळमोदा ते खिरोदा.आभोडा ते मंगरुळ.लोहारा ते सावखेडा.न्हावी ते हिंगोणा.विरावली ते चुंचाळे.सावखेडासिम ते मालोद.हंबर्डी ते मारुळ.बोरखेडा ते तिड्या अंधारमळी मोहमांडी निमड्या गारखेडा.कुसूंबा ते रावेर.मुंजलवाडी ते रमजीपुर. वढोदा ते विरावली.पाल ते गारखेडा.असे बरेचशे रस्ते शेवटची खटका मोजत आहे.

 

संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत गंभीर विचार करावा. व हे रस्ते तात्काळ डांबरीकरण करावे. अशी रास्त स्वरुपाची मागणी रावेर,यावल तालुक्यातील जनतेकडुन,शेतकऱ्यांकडुन मागणी करण्यात आली आहे. संबधित रस्त्यांची दखल न घेतल्यास,सदरील रस्ते डांबरीकरण न केल्यास संबधित रावेर यावल तालुक्याच्या जनतेकडुन व शेतकऱ्यांकडुन उपोषण करणार? असल्याचे रावेर,यावल तालुक्याच्या जनतेकडुन संबधित बांधकाम विभागाला इशारा देण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here